आजचे राशीभविष्य; या राशीच्या लोकांना वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील

तरुण भारत लाईव्ह । १५ एप्रिल २०२३ : दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 

मेष रास 

भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.  वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार सुरू करण्याकरिता उत्तम दिनमान आहे.

वृषभ रास

रोजगारात सफलता मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. विधायक कार्य हातुन घडेल.

मिथुन रास


नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल.  तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहइच्छुकांचे विवाह जमतील. निरनिराळ्या सुचणाच्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील आरोग्य उत्तम राहिल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या मानसन्मानात वाढ होईल.

कर्क रास

काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. चंद्रबल उत्तम लाभलेले आहे. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. सामाजिक राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

सिंह रास

व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.  लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.

कन्या रास

विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.  व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी रहाल.

तूळ रास

मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल.

वृश्चिक रास

मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य घडेल.  साधुसंत व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.

धनु रास

दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भभवू शकतो. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल.

मकर रास
वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. दिनमान उत्साहवर्धक राहील.

कुंभ रास

स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल.

मीन रास

व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल.  अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. घर वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास लाभदायक होतील.