Jalgaon Winter : जळगावकरांनो स्वत:ची काळजी घ्या, थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता !

जळगाव ।  उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, नगर, जळगावसह राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी घसरू शकते आणि थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

महत्त्वाचे तापमान 

नगर: ६.४ अंश (राज्यात सर्वात कमी)
पुणे: ९.० अंश (एनडीए भागात ८ अंश)
जळगाव: ७.९ अंश
छ. संभाजीनगर: ८.८ अंश
परभणी: ८.६ अंश
नाशिक: १०.६ अंश

पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहून सकाळी हलकासा धुके पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत मात्र थंडी कमी असून तापमान : २२.४ अंश नोंदले गेले. थंडीची झळ ग्रामीण भागांसह शहरी भागांतही जाणवत असून, नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर सुरू केला आहे.