---Advertisement---
जळगाव : गेल्या महिन्यांपासून जिल्ह्यात हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अनेक विवाहित महिलांनी आत्महत्या केली आहे. अशातच पुन्हा एका विवाहित महिलेचा सासरच्यांकडून छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या उजमा शेख नबील (वय ३०) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केला. हा प्रकार सन २०१५ पासून सुरू होता. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
भुसावळ तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एका जणाने विनयभंग केला. ही घटना १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरच्या दरम्यान घडली. या प्रकरणी १ ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कगागान याला आहे
पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
शेतातील विहिरीमध्ये बुडून रोहन उमेश पाटील (२५, रा.ढेकू सीम, ता. अमळनेर) यांचा मृत्यू झाला. ही घटन १८ ऑक्टोबर रोजी ढेकू सीम शिवारात उघडकीस आली. तरुणाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंव करण्यात आली आहे.