दुर्दैवी! ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

---Advertisement---

 

धुळे : शहरालगत असलेल्या गोंदूर रस्त्यावर एका हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने ही घटना रविवारी घडली.

धनंजय पाटील असे मृत तरुणाचे नांव आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदूर येथील धनंजय महेंद्र पाटील (वय २४) हा तरुण बैलगाडीने गोंदूर रस्त्यावरील ‘हॉटेल प्यासा’ समोरून जात होता. त्याच वेळी एमएच-१८ सीई-४८७९ क्रमांकाच्या एका भरधाव ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने त्याच्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण जगताप करत आहेत.

या अपघातात धनंजय गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तत्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

सुधीर दत्तात्रय पाटील (वय ४५, रा.गोंदूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---