परंपरागत ग्रामोद्योगींना स्फूर्तीचे पाठबळ

– दत्तात्रेय आंबुलकर

Sfurti Yojana स्फूर्ती योजनेची पृष्ठभूमी म्हणजे ग्रामीण भागातील कृषी व तत्सम क्षेत्रावर आधारित स्वयंरोजगार वा कुटिरोद्योग करणा-या उद्योगी कारागिरांना सामूहिक स्वरूपात मार्गदर्शनासह आर्थिक मदत करणे. Sfurti Yojana यामध्ये प्रामुख्याने हातमाग, ग्रामीण कलाकुसर, खादी व संबंधित उत्पादन, नारळावर आधारित वस्तू, बांबूशी निगडित उत्पादने, लाकडी खेळणी, मध संकलन, कृषी उत्पादनावर आधारित, फळप्रक्रिया या आणि यांसारख्या उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. Sfurti Yojana ग्रामीण उद्योग क्षेत्रावर आधारित या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने २००५-०६ मध्ये केली. स्फूर्तीचे नव्याने पुनरुज्जीवन २०१४ मध्ये व्यापक स्वरूपात करण्यात आले, हे यासंदर्भात उल्लेखनीय!

योजनेचा मुख्य उद्देश परंपरागत कुटिरोद्योग करणा-या ग्रामोद्योगींना त्यांच्या व्यवसायाला आर्थिक मदतीद्वारा पाठबळ उपलब्ध करून देणे हा आहे. Sfurti Yojana यामागे विशेषतः ग्रामीण भागात कारागीर लघुउद्योजकांना त्यांच्या कौशल्य व कारागिरीवर आधारित सामूहिक स्वरूपात उद्योजकता विकसित करण्यासाठी मदत करणे, हा उद्देश आहे. Sfurti Yojana स्वयंरोजगारातून कृषीवर आधारित ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी व्यावसायिक एकक स्वरूपात काम करण्यावर भर दिला जातो. योजनेमध्ये ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादन प्रक्रियेपासून विक्री व्यवसायापर्यंतच्या टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. स्फूर्ती अंतर्गत ग्रामीण भागातील नियमित लघुउद्योगांच्या एककांना प्रचलित नियमांनुसार अर्थसाहाय्य करण्यात येते. Sfurti Yojana प्रचलित नियमांनुसार ५०० पर्यंत ग्रामीण कारागीर लघुउद्योजकांच्या एकक म्हणजे क्लस्टरसाठी अडीच कोटी रुपयांपर्यंत तर ५०० हून अधिक लघुउद्योजक ग्रामोद्योगींच्या एककाला पाच कोटींपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाते. या अर्थसाहाय्याचा उपयोग कृषी क्षेत्रातील व ग्रामीण उद्योजकतेवर आधारित लघुउद्योजकांना घेता येतो.

वरील आर्थिक मदतीशिवाय स्फूर्ती अंतर्गत ग्रामीण व कुटिरोद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या स्वरूपात मार्गदर्शनपर मदत केली जाते. यामध्ये थेट व प्रत्यक्ष मदत म्हणून ग्रामोद्योगी एककासाठी गरजेनुरूप सार्वजनिक उत्पादन प्रक्रिया केंद्र अथवा सर्व लघुउद्योजकांना उपयुक्त ठरेल, असे सुविधा केंद्र स्थापन करता येते. Sfurti Yojana या स्वरूपाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या केंद्रामध्ये लघुउद्योजक एककाच्या गरजेनुरूप आवश्यक अशी उपकरणे व मशिनरी डिझाईन केंद्र सामूहिक स्वरूपातील कच्च्या मालाची खरेदी इ. चा समावेश होऊ शकतो. सामूहिक उद्योग प्रक्रिया केंद्रांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष कामाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणे, मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, संबंधित कार्यरत एकक केंद्राला भेटी देणे, यासाठी मदत राशी मिळते. Sfurti Yojana याशिवाय ग्रामोद्योगी एकक प्रस्थापित झाल्यावर त्यांना विक्री व्यवसाय, ई-मार्केटिंग व्यावसायिक पद्धतीने प्रचार-प्रसार प्रगत संशोधन व विविध व्यावसायिक उपक्रमांसाठी अर्थसाहाय्य स्फूर्ती देत आहे.

Sfurti Yojana ग्रामीण लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांसाठी असणा-या स्फूर्ती योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण कारागीर अथवा लघुउद्योजक विशिष्ट एकक स्वरूपात कार्यरत असावेत. याशिवाय ग्रामोद्योग क्षेत्रात काम करणा-या प्रस्थापित समाजसेवी संस्था, राज्य वा केंद्र शासनाच्या या क्षेत्रात काम करणाèया संस्था पंचायत राजविषयक काम करणा-या संस्था पण स्फूर्ती योजनेंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. स्फूर्ती योजनेंतर्गत समाविष्ट एककांच्या प्रकल्पपूर्तीचा कालावधी १२ ते १८ महिने असतो. यादरम्यान योजनेत समाविष्ट कारागीर चार हप्त्यांमध्ये त्यांचे शुल्क भरू शकतात. Sfurti Yojana सुरुवातीच्या अंमलबजावणी काळानंतर समाविष्ट ग्रामोद्योगींना त्यांचा व्यवसाय-उद्योग व कारागिरी-कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी अंमलबजावणी संस्था, विषयतज्ज्ञ, मार्गदर्शक, लघुउद्योग विकास संस्था यासारख्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. सरकारी स्तरावर ग्रामीण उद्योजकांना आर्थिक मदतीशिवाय तांत्रिक मार्गदर्शन, गरजेनुरूप संगणकीय अद्ययावत पद्धती, उत्पादन व प्रशासनिक प्रक्रियांचे सुलभीकरण, सतत सुधारणा पद्धतीवर भर व त्यासाठी प्रोत्साहन, प्रगत प्रक्रिया पद्धतीचा अवलंब, सहभागी सदस्य कारागिरांना आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.Sfurti Yojana

Sfurti Yojana परंपरागत कारागिरी व कौशल्य यांची व्यावसायिक सांगड घालून त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ व वाढते उत्पन्न मिळावे, यासाठी आवश्यकतेनुरूप प्रयत्न केले जातात. यामध्ये स्थानिक स्तरांवरील विविध कलात्मक पद्धतींवर आधारित वस्तूंच्या विक्रीसाठी आदिवासी विकास मंत्रालय, पर्यटन विकास मंडळ इत्यादींचा वापर केला जातोे. Sfurti Yojana कृषी उत्पादन, फलोत्पादन व प्रक्रिया यावर आधारित ग्रामीण लघु उद्योजकांना त्यांच्या संबंधित पदार्थांमध्ये गुण, दर्जा, चव व त्यांची उपयुक्तता यामध्ये वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये अशा उत्पादनाचे पॅकिंग, साठवणूक, वाहतूक व विक्री यासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना दिली जाते. Sfurti Yojana विशेषत: अन्नप्रक्रिया क्षेत्राशी निगडित उत्पादनांचा दर्जा सुधारून संबंधित ग्रामोद्योगीला अधिक फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचा लाभ बहुसंख्य कृषी उद्योजकांना होऊ शकतो.

ग्रामीण उद्योग एककांना परस्पर संपर्क-सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा उपयोग केला जातो. सामूहिक वाहतूक व्यवस्था पद्घतीचा अवलंब करण्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. Sfurti Yojana त्याद्वारे वाढत्या विक्री व्यवस्थेचा लाभ मिळू शकतो. कृषी उद्योगांना गरजेनुरूप व वेळेत तंत्रज्ञानासह मदत व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी एकक स्तरावर संबंधित अंमलबजावणी विभाग वा यंत्रणेद्वारा अभियांत्रिकी, कृषी विकास, अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-या शैक्षणिक व संशोधन संस्थांचे सहकार्य करून दिले जाते. Sfurti Yojana याशिवाय ग्रामीण उद्योगांच्या प्रत्येक एककामध्ये सौरऊर्जेला प्राधान्य, पर्यावरण संरक्षणावर भर, स्थानिक कौशल्यांसह कच्च्या मालाचा वापर याला प्रोत्साहन दिले जात असल्याने कृषी व ग्रामीण उद्योग आणि लघु-उद्योजकांना पाठबळ उपलब्ध झाले आहे.

Sfurti Yojana आकडेवारीसह सांगायचे म्हणजे, २०१५-१६ मध्ये ग्रामीण व कृषी उद्योगांच्या एककांची जेमतेम सुरुवात झाली होती. गेल्या सुमारे सहा वर्षांत यशस्वी व कार्यरत ग्रामीण उद्योग एककांची संख्या १०० वर झाली आहे. याशिवाय आणखी ४०० लघुउद्योग एककांना शासकीय मंजुरी मिळाली असून त्यांची पुढील प्रशासनिक प्रक्रिया सुरू आहे. Sfurti Yojana परंपरागत स्वरूपाच्या प्रमुख यशस्वी ग्रामीण उद्योग एककांमध्ये जम्मू-काश्मीरचा गालिचा उद्योग, मेघालयातील बांबू कलाकारी, कर्नाटकातील खेळणी, राजस्थानमधील जंगली व नैसर्गिक रंग, बिहारची मधुबनी चित्रकारी, कोल्हापूरचे आकर्षक साज, केरळचे दोर उत्पादन, उत्तरप्रदेशातील पायपोस, ओडिशाचे मरठ धान्य उत्पादन, अरुणाचलची खादी सिल्क इ. चा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. Sfurti Yojana ग्रामीण भागातील व कृषीवर आधारित उद्योग आणि परंपरागत लघु-उद्योजकांच्या यशस्वी उद्योजकतेचा उत्साहवर्धक परिचय आता स्फूर्तीच्या माध्यमातून सर्वांनाच होत आहे.
९८२२८४७८८६