Train Accident : दिल्लीत रेल्वेचा भीषण अपघात; ८ डबे रुळावरून घसरले

 Train Accident :  राजधानी दिल्लीत  जखीरा येथे मालगाडीचे  ८ डबे रुळावरून घसरले.   अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला.

 

मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरलेले होते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे  वृत्त नाही. ही घटना सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे

डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा ​​यांनी सांगितलं की, रूळावर कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल आणि रेल्वेने मदतकार्य सुरू केलं

ही मालगाडी सकाळी 11.55 च्या सुमारास झाखिरा उड्डाणपुलाजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे ती पलटी उलटली झाली .  मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन मुंबईहून चंदीगडला जात होती.