भुसावळ दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील तिसरा रेल्वे मार्ग तसेच प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन- इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द तर दोन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
काझीपेठ-बल्लारशाह विभागातील आसिफाबाद रोड आणि रेहचानी रोड स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे काम करण्यात येत आहे. यामुळे गाडी क्र. २२१५१ पुणे काजीपेठ एक्स्प्रेस ही गाडी २८ जून व ५ जुलै रोजी तर क्र.२२१५२ काजीपेठ पुणे एक्स्प्रेस प्रवास ३० जून व ७ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.
क्र. २०८२० ओखा-पुरी एक्स्प्रेस २६ जून आणि ३ जुलै रोजी तसेच क्र.२०८१९ पुरी-ओखा एक्स्प्रेस २३ व ३० जून रोजी विजयनगरम, रायगड, तिटीलागढ, रायपूर, नागपूर, वर्धा मार्गे वळवली जाईल. क्र. २०८०३ विशाखापट्टणम गांधीधाम एक्स्प्रेस २७ जून व ४ जुलै रोजी तर क्र.२०८०४ गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस २३ जून आणि ३० जून रोजी वर्धा,नागपूर, रायपूर, तिटीलागढ, रायगढ, विशाखापट्टणम मार्गे वळवली जाईल. ही गाडी चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर, मंचिरयाल, रामागुंडम, वारंगल, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट स्थानकांवर जाणार नाही, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.