---Advertisement---
वाराणसी : कारने प्रवास करतांना अनेकदा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. मात्र एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? मात्र वाराणसीमध्ये एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक ट्रेन रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथील असल्याची माहिती आहे. ट्रेन खरोखरच ट्रॅफिकमध्ये अडकली असून चालक हॉर्न वाजवून वाजवून बेजार झाला आहे. ट्रॅफिक पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. वाहनांच्या गर्दीमध्ये ट्रेन एकाच जागी बराच वेळ ट्रॅकवर उभी आहे तरीही रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होत नाही.
दरम्यान, ट्रेन आल्यानंतर रेल्वे गेट बंद होण्याची सुविधा प्रत्येक क्रॉसिंगच्या ठिकाणी असते पण या ठिकाणी ट्रेन आली तरी रस्त्यावरून वाहने चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्रेन आल्यानंतर बंद होणाऱ्या गेटमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ही वाहतूक कोंडी झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
India is not for the beginners ???????? pic.twitter.com/sSFLZWS3BK
— BALA (@erbmjha) August 13, 2023