training program : सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती करिता रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण कार्यक्रम

training program : जळगाव येथे चर्मकार प्रवर्गातील लोकांकरिता मोफत रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र शासन, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित,(लीडकॉम) मुंबई द्वारा पुरस्कृत व

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जळगाव आयोजित कार्यक्रमाच्या निवडी करिता एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम  १६ शुक्रवार रोजी,  सकाळी ११.०० वाजता  जिल्हा उद्योग केंद्र हॉल शासकीय आय.टी.आय.शेजारी हायवे नं. -६, जळगाव येथे घेण्यात येत आहे .

 

प्रशिक्षणामध्ये नऊवारी साडी तयार करणे, ड्रेस विविध प्रकार, ब्लाउज आणि वन पीस तयार करणे ई चे तांत्रिक प्रशिक्षण १ महिना देण्यात येणार आहे त्याच बरोबर जिल्हा उद्योग केंद्रयोजना CMEGP, PMEGP,व्यक्तिमत्व विकास, ध्येय निश्चिती, संभाषण कोशल्य,कच्चा माल, लघुउद्योग नोंदणी, शासकीय निमशासकीय कर्ज व अनुदान योजना, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण (AMT), विविध वित्तीय महामंडळाकडून मिळणारे अनुदान, मार्केटिंग, मार्केट सर्वे, प्रकल्प अहवाल, उद्योगासाठी लागणारे व

विविधपरवाने, लघुउयोगाचे कायदे, उद्योग उभारणीचे टप्पे, उद्योग व्यवस्थापन तंत्र मंत्र, इम्फोर्मेशन टेक्नॉलॉजी / इंटरनेट द्वारे करता येणारे उद्योग, आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात धोरणे,यशस्वी उद्योजकांशी संवाद व उद्योग घटकाना भेटी,उद्योगासाठी लागणारी संपूर्ण माहिती देऊनउद्योग उभारणी पर्यंत वेळोवेळी साह्य करण्यात येणार आहे.

 

प्रशिक्षणपूर्ण करणाऱ्या युवती व महिलेस वर्षभर दरमहा उद्योजक मासिक व प्रशिक्षण लिखाण व वाचन साहित्य देण्यात येणार आहे.  १८ ते ५० दरम्यान वय तसेच किमान ७ वी पास अशा महिलांनी/पुरुष व युवक/युवतीनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवहान  दिनेश गवळे मोबाईल ९७६४३३००११ प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी. व्दारा जिल्हा उद्योग केंद्र जळगाव, व्यवस्थापक,  समशेर तडवी , संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित,(लीडकॉम) जळगाव यांनी केले आहे.