जयपूर : तृतीयपंथीयाने आपल्या प्रियकराकडून मिळालेल्या फसवणुकीच्या धक्क्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जयपूरच्या भादरपुरा गावात घडली. रूपा देवी माहेश्वरी (३२, रा. पुणे) असे मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे.
रूपा आणि जयपूरचा तरुण यांच्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रूपा नियमितपणे जयपूरला जाऊन प्रियकराला भेटत असे. काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयाला प्रियकराने धोका देत असल्याचा संशय आला. त्यानंतर रूपा विमानाने जयपूरला पोहोचली.
प्रियकराच्या नकारामुळे हादरले मन
रूपा नेहमीप्रमाणे सांभरला पोहोचून प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेर थांबली. मात्र, प्रियकराने बाहेर येण्यास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या रूपाने कीटकनाशक प्राशन केले.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
मृतदेहाजवळ सापडली सुसाईड नोट
१४ जानेवारी रोजी सांभर तलावाजवळ रूपाचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ कीटकनाशकाची बाटली, विमानाचे तिकीट, पिशवी सापडली. रूपाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये प्रियकराच्या नकारामुळे नैराश्येच्या अवस्थेत आत्महत्या करण्याचा उल्लेख आढळून आला आहे.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
कुटुंबाचा विरोध ठरला कारण
रूपा आणि प्रियकराच्या नात्याबद्दल तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती होती. त्यांनी त्याला रूपाशी संबंध तोडण्यास भाग पाडले होते. या विरोधामुळे प्रियकराने रूपाशी बोलणे बंद केले. याच संशयावरून रूपाने जयपूर गाठले होते.
पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपशीलवार अभ्यास सुरू केला आहे. रूपाच्या कुटुंबीयांना देखील घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.