तरुण भारत लाईव्ह ।१८ जानेवारी २०२३। ग्रह बदल झाल्यामुळे आपल्या जीवनावर त्याचे सकारात्मक तर काही नकारात्मक प्रभाव पडत असतो. आज म्हणजेच १८ जानेवारी २०२३ या दिवशी बुध ग्रह धनु राशीमध्ये फिरत आहे. बुधाच्या संक्रमणामुळे काही राशींच्या जीवनात कठीण काळ सुरु होऊ शकतो. तर नेमकं कोणत्या राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे ते आपण जाणून घेऊया.
वृषभ रास
बुधाच्या संक्रमणमुळे वृषभ राशींच्या जीवनात कठीण काळ येऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तसेच आरोगयच्या तक्रारी उदभवू शकतात. लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात, शक्य असेल तर प्रवास करू नका.
कर्क रास
बुधाचे संक्रमण तुमच्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देईल. तुम्ही निरुपयोगी कामात वेळ वाया घालवाल, आर्थिक गुंवणूक जपून करा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. दगदग करू नये. वाहन चालवल्यास सावधानता बाळगा,
धनु रास
या कालावधीमध्ये धनु राशीच्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे. नोकरीच्या ठिकाणी वाद संभवतो. आर्थिक बाबी सांभाळून कराव्या.या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल दिसून येतील, ज्याची तुम्हाला अपेक्षा नसेल.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी बुध संक्रमण हे काहीस संमिश्र ठरू शकते. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. आरोग्याची काळजी घ्यावी बाहेरचे पदार्थ खाऊ नये. गुंतवणुकीच्या बाबी काळजीपूर्वक समजून घ्याव्यात जेणेकरून आर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत