तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३।ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांची मांडणी करण्यात आली आहे. गोचर कालावधीनुसार ग्रह राशी आणि नक्षत्र बदल करत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. 25 मे रोजी सूर्य ग्रह चंद्राच्या नक्षत्र राशीत आला आहे. सूर्यदेव या राशीत 8 जून 2023 पर्यंत राहणार आहे. राशीचक्रातील पाच राशींना या गोचराचा सर्वाधिक फायदा होईल. तर कोणत्या आहेत त्या पाच राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
सूर्याच्या या गोचरामुळे मेष राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. त्याचबरोबर आपल्या गोड बोलण्याने काही चांगले संबंध प्रस्थापित होतील.
वृषभ रास
सूर्याच्या रोहणी नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशीच्या जातकांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. तसेच समाजात प्रतिष्ठा वाढेल.
कर्क रास
करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक मिळकतीचे स्रोत चांगले राहतील. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समाजावर पडलेला दिसून येईल.
सिंह रास
या राशीच्या दहाव्या स्थानात गोचर असणार आहे. गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळताना दिसेल.
धनु रास
या राशीच्या सहाव्या स्थानात सूर्यदेव गोचर करणार आहेत. कुटुंबाची चांगली साथ तुम्हाला या काळात मिळेल. तसेच जोडीदाराकडून मोठी मदत तुम्हाला होईल.