शुक्र ग्रहाचे वृषभ राशीत गोचर; या ‘तीन’ राशींना होणार फायदा

तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। राशीचक्रात थोड्या थोड्या अंतराने उलथापालथ होत असते. ज्योतिशास्त्रानुसार ग्रहांच्या मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो.  ग्रह एका ठिकाणी कायमस्वरुपी स्थित नसतात. ग्रह वेगवेगळ्या राशीत गोचर करतात त्यामुळे त्याची फळ वेगवेगळी असतात. आता 6 एप्रिलला शुक्र वृषभ राशीत गोचर करणार आहे. ही शुक्राची स्वरास आहे. शुक्राच्या या गोचरामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. हा शुभ योगांपैकी एक योग आहे. मालव्य राजयोगामुळे जीवन आनंददायी होते. कामावर लक्ष केंद्रीत राहिल्याने फायदा होतो. या स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे. तर कोणत्या आहेत या तीन राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वृषभ रास 
या राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण शुक्र या राशीचा स्वामी आहे.  या काळात आत्मविश्वास दुणावेल. तसेच आर्थिक स्थिती एकदम रुळावर आलेली दिसेल. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. राजयोगाची दृष्टी सातव्या स्थानावर पडणार असल्याने जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

सिंह रास 
या राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या जातकांना निश्चितच फायदा होईल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलांकडून तुम्हाल चांगलं सहकार्य मिळू शकतं.

मेष रास 
या राशीच्या जातकांसाठी शुक्र गोचर कुंडलीतील दुसऱ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे.  धनलाभाच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला आहे. या गोचर कालावधीत काही इच्छा पूर्ण करणे सहज शक्य होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.