प्रयागराज : देशभरातून लाखो भाविक महाकुंभ स्नानासाठी प्रयागराज दाखल होत असून, 29 जानेवारीच्या मौनी अमावस्येच्या दिवशी 10 कोटी श्रद्धाळू त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येण्याचा अंदाज आहे. मकर संक्रांतीला 3.5 कोटी भाविकांनी अमृत स्नान केले होते. आता मौनी अमावस्येच्या स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाने शहरात गर्दीचा झंझावात उभा केला आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे, बस आणि विमान सेवा दृष्टीने मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने वाहतूक व्यवस्थेला आव्हान निर्माण झाले आहे.
हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!
रेल्वे, बस आणि विमानांच्या तिकीटांची मागणी प्रचंड वाढली आहे, ज्यामुळे तिकीट दरातही चांगलीच वाढ झाली आहे. चेन्नई ते प्रयागराजच्या राऊंड ट्रिपसाठी 1 लाख ते सव्वा लाख रुपयांपर्यंत विमान तिकीट पोहोचले आहे. विशेषत: कनेक्टिंग फ्लाइटसाठी तिकीट दरात दुप्पट वाढ झाली आहे.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
29 जानेवारी रोजी चेन्नईहून प्रथम कनेक्टिंग फ्लाइट मुंबईच्या मार्गाने दुपारी 1.14 वाजता प्रयागराज पोहोचेल. त्यासाठी प्रवाशांना 1.13 लाख रुपयांपर्यंत मोजावे लागेल. दिल्लीहून प्रयागराज साठी एअर इंडिया, अकासा एअर, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या विमान सेवांचा तिकीट दर 50,000 रुपये ते 70,000 रुपये दरम्यान आहे. फ्लेक्सी फेअरमुळे हे तिकीट एक लाख रुपये पर्यंत पोहोचू शकते.
इतर शहरांमधून तिकीट दर
मुंबई-प्रयागराज: ₹55,000
हैद्राबाद-प्रयागराज: ₹54,000
बंगळुरू-प्रयागराज: ₹70,000
कोलकाता-प्रयागराज: ₹70,000
अहमदाबाद-प्रयागराज: ₹54,000
भुवनेश्वर-प्रयागराज: ₹49,000
रायपूर-प्रयागराज: ₹48,000
लखनऊ-प्रयागराज: ₹49,000
गुवाहाटी-प्रयागराज: ₹50,000
जयपूर-प्रयागराज: ₹54,000
दरम्यान, प्रयागराजला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे, त्यामुळे सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.