मोठी बातमी! फ्रान्ससोबत झाला ‘हा’ करार, आता…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI बाबत करार झाला आहे. यानंतर, आता फ्रान्समध्ये देखील UPI वापरता येणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गुरुवारी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लवकरच भारतीय पर्यटक आयफेल टॉवरवरही UPI पेमेंट करू शकतील. फ्रान्समध्ये UPI द्वारे पेमेंट करण्याचा करार करण्यात आला आहे, त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल. ते म्हणाले की, भारतीय लोक यूपीआयच्या माध्यमातून रुपयात पैसे भरू शकतील. या करारामुळे भारतासाठी नवी बाजारपेठ उघडेल.

सुत्रानुसार, पॅरिसमधील सीन म्युझिकलमध्ये भारतीय लाेकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा यूपीआय असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांनी देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणला आहे.

मला आनंद आहे की भारत आणि फ्रान्स या दिशेने एकत्र काम करत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये, UPI सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फ्रान्सच्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम ‘Lyra’ सोबत एक सामंजस्य करार केला होता. गुरुवारी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भारताला विकसनशील देश बनवायचे असेल तर तुम्ही देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे.