---Advertisement---
जामनेर : येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत गुरुवारी ( १८ सप्टेंबर) नवीन शासकीय गोदाम परिसर, जामनेर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी नगराध्यक्ष साधना गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरपरिषद, महसूल विभाग तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तहसीलदार नानासाहेब आगळे जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सक्रिय सहकार्य देण्याचे आवाहन करण्यात आले. या वृक्षारोपण उपक्रमामुळे जामनेर शहर व परिसर हिरवाईकडे वाटचाल करेल तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.