तरुण भारत लाईव्ह । ४ सप्टेंबर २०२३। ज्योतिशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असतात. शनी ग्रह हा वक्री स्थितीत भ्रमण करत आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होत आहे. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तीन राशींना फायद्याचं ठरणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कुंभ रास
या काळात या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात भरभराट होऊ शकते. घरात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. या काळात तुमचे मन सकारात्मक असेल. नोकरीत प्रमोशन होण्याची चिन्ह आहेत. आरोग्य उत्तम राहील.
तूळ रास
या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नफा होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण असेल. मुलांची प्रगती होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
सिंह रास
या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सहलीला जायचा योग आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील.