मुंबई : संकटमोचक म्हणून ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे आज पुन्हा मदतीला धावले. भाजपची कार्यशाळा आज मुंबईत पार पडली. यावेळी भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी भाजपचे संकटमोचक पुन्हा मदतीला धावले.
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनांच्या मदतीने तिन्ही आमदारांची सुटका करण्यात आली. लिफ्टचा दरवाजा वाकवत महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. लिफ्टमध्ये अस्वस्थ आमदार म्हात्रे यांना दरेकरांनी आधार दिला.