रावेर वनविभागाने पकडला अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक, तस्करमध्ये खळबळ

रावेर : कडुलिंब वृक्षाची अवैध वाहतूक करणारा ट्रक रविवारी पहाटेच्या सुमारास रावेर वनविभागाने जप्त केला. तसेच दुपारच्या सुमारास डिंक तस्कराला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, रावेर वनविभागाकडुन कारवाईचा सपाटा सुरू असल्याने अवैध डिंक वाहतुक तसेच लाकुडतोड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात डिंकाची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या दोन मोटारसायकवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास कडुलिंब वृक्षाची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला होता. तसेच दुपारच्या सुमारास डिंक तस्कराला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. या  कारवाईळे अवैध डिंक वाहतुक तसेच लाकुडतोड्यांमध्ये  एकच खळबळ उडाली आहे.

वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी पहाटे रसलपुर ते रावेर रस्त्याने विनापरवाना जळावू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच १९ झेड ७७६२ ट्रक मुद्देमालासह सापळा रचून जप्त करण्यात आला. वाहन चालक शेख कलीम शेख कबीर रा.रावेर यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये आगार रक्षक प्रथम रिपोर्ट क्रमांक ०१/२०२३ दिनांक २६/०२/२०२३चा दाखल करून गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास आगार रक्षक रावेर करीत आहे.

 

सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळे (प्रा.) दिगंबर पगार, उपवनसंरक्षक यावल जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने नपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, वनपाल रावेर रवींद्र सोनवणे, वनपाल पालश, अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांनी केली. तसेच दुसऱ्या घटनेत मोराव्हल ते जीन्सी तांडा जवळ अवैध गौण धावडा डिंक वाहतुक करणारी मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डि जी ०६६५ किंमत रु ३०,००० डिंक ५५ किलो किंमत १५००० हजार रुपये असा एकुण ४५००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यातत घेतला. भा.दं.क १९२७ चे कलम ४१/(ब) ४२,५२ नुसार वनरक्षक जिन्सी प्र.री.क्र.०१/२०२३ दि २६/०२/२०२३ अन्वये जप्त केला आहे. आरोपी मीर सुभन तडवी याची चौकशी सुरू आहे.सदर कारवाई व वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे,पालच्या वनपाल अरुणा ढेपले, जिन्सीचे वनरक्षक रमेश भुतेकर यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.