तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। गोंदियामधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. लग्नसोहळा आटोपून पुन्हा घरी जात असताना ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात तीन चिमुकल्यांसह बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील पिंडकेपार इथे लग्न सोहळ्याकरिता बिसेन कुटुंबीय दासगाव वरून आले होते. लग्न सोहळा संपल्यानंतर दासगाव येथे परत आपल्या मोटरसायकलने जात होते. त्यावेळी ढाकणी ते भागवत टोला या रस्त्यावर ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, त्या धडकेत घटनास्थळी दोन मुलांचा व ३७ वर्षीय बिसेन यांचा मृत्यू झाला. आदित्य बिसेन (7 वर्ष) , मोहित बिसेन (११ वर्ष), कुमेंद्र बिसेन (37 वर्ष) (रा. दासगाव ) आणि आर्वी कमलेश तूरकर (5 वर्ष) (रा. चुटिया) अशी मृतांची नावे आहेत.
अपघाताना नंतर ट्रक चालत घटना स्थळावरून फरार झाला. या अपघाताची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत जखमीना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.