---Advertisement---
नंदुरबार : शहरातील कृषी महाविद्यालयासमोर भरधाव वेगातील ट्रकने प्रवासी चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चालक जखमी झाला. याप्रकरणी खुमानसिंग राजपूत यांनी नंदुरबार शहर पोलिस दिलेल्या ठाण्यात फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील कृषी महाविद्यालयासमोर भरधाव वेगातील ट्रकने प्रवासी चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चालक जखमी झाला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. खुमानसिंग भगवानसिंग राजपूत हे शुक्रवारी जीजे ०५ आरजी७६३३ हे चारचाकी वाहन घेऊन नंदूरबारकडे येत असताना कृषी महाविद्यालयासमोरील कृषी केंद्रासमोर समोरून आलेल्या एमएच १७ बीवाय ५१५१ या ट्रकने त्यांना धडक दिली.
धडकेत खुमानसिंग राजपूत यांच्या पायाला दुखापत होऊन वाहनाचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी खुमानसिंग राजपूत यांनी नंदुरबार शहर पोलिस दिलेल्या ठाण्यात फिर्यादीवरून ट्रकचालक दिनेश लक्ष्मण भवरे (४२) रा. देवळा, जि. नाशिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार राजेश येलवे करत आहेत.