ट्राय करा! पुण्याची भाकरवडी

तरुण भारत लाईव्ह ।०९ फेब्रुवारी २०२३। पुण्याचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे भाकरवडी, खमंग, खुसखुशीत अशी भाकरवडी हि सगळ्यांनाच आवडते. पुण्याची भाकरवडी खायला आता पुण्याला जायची गरज नाही. पुण्याची भाकरवडी हि आपल्याला घरी सुद्धा बनवता येईल हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
मैदा, बेसन, मीठ, तेल, ओवा

सारणासाठी
 बेसन, तीळ, खसखस, आले लसूण पेस्ट,लाल तिखट, पिठीसाखर, गरम मसाला, धनेपूड, बडीशेप, किसलेले सुकेखोबरे, बारीक शेव, मीठ

 कृती
सर्वप्रथम मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा. नंतर तेल गरम करून पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे. तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी. सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ, तीळ, खसखस एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे. सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा. सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे. गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत. बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.