पावसाळ्यात घरीच ट्राय करा ‘तंदुरी भुट्टा’

तरुण भारत लाईव्ह । ३१ ऑगस्ट २०२३। पावसाळ्यात गरमागरम भुट्टा खाण्याची मजा काही वेगळीच असते. अनेकदा पावसाळ्यात टेस्टी खाण्याची इच्छा होते. पण टेस्टी खाण्यासाठी  प्रत्येक वेळी बाहेर जावं लागत. पण मसालेदार भुट्टा तुम्ही घरीच खाऊ शकता. मसालेदार भुट्टा घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
कणीस, दही, मीठ लिंबू, तिखट, मिरपूड, आले लसूण पेस्ट, बटर,

कृती
सर्वप्रथम, दही चांगल्याप्रकारे फेटून घ्यायचे त्यामध्ये मीठ, मिरपूड, आले लसूण पेस्ट हे सगळं घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. यानंतर कणीस हे उकडून घ्यावे. त्यानंतर उकडलेल्या कणीस वर हे दह्याचे मिश्रण लावून घ्यावे आणि हे कणीस भाजून घ्यावे. कणीस भाजून झाल्यावर त्यावर लिंबू आणि बटर लावून घ्यावे. तयार आहे गरमागरम मसालेदार भुट्टा