व्हेज सॅण्डविच एकदा ट्राय कराच

तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। संध्याकाळच्या वेळेला भूक लागल्यावर वेगळं काहीतरी चमचमीत खायला हवं असत. पण वेगळं काय बनवावं हा प्रश्न पडतो. तर अशावेळेला व्हेज मेयो सॅण्डविच बनवू शकतो. या सॅण्डविचसाठी आपण बरेच पैसे मोजतो. पण हे घरी बनवायला अतिशय सोपं आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
ब्रेड, मेयो सॉस, कांदा, टॉमेटो, काकडी, गाजर, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, केचअप

कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये मेयो सॉस काढून घ्या. त्यामध्ये कापलेला कांदा, टॉमेटा, काकडी, गाजर हे सगळं मिक्स करा. त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि हवं असल्यास, चाट मसाला घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या. आता ब्रेडचे काप घ्या. त्याच्या कडा काढून टाका. नंतर वरील मिश्रण त्या स्लाईसवर नीट लावा. दुसरा ब्रेड त्यावर ठेवा. दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लावा आणि मग मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करा अथवा तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या आणि केचअपबरोबर खायला घ्या.