Tulsi Vivah 2024 । तुळशी विवाह हा हिंदू धर्माच्या अनुयायांकडून केला जाणारा एक औपचारिक विवाह सोहळा आहे. त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नावही विष्णुप्रिया आहे. कारण तुळशी माता विष्णूची पत्नी मानली जाते. दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. यंदाच्या तुळशी विवाहाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.
वैदिक पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजून ०४ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१ वाजून ०१ मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे. उदयतिथीमुळे १३ नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे.
यंदा तुळशी विवाह दोन शुभ मुहूर्तांमध्ये पार पडणार आहे. त्यानुसार, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे दोन शुभ योग जुळून आले आहेत. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी ०७ वाजून ५२ मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल हा मुहूर्त १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ०५ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, रवि योग सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटं ते ०७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
हिंदू धर्मात कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोकं तुळशी विवाहाची परंपरा पाळतात, त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते. तुळशीविवाह घराच्या अंगणात करावा. यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडा. असे मानले जाते की ज्या घरात शालिग्राम जी (भगवान विष्णु) आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी राक्षसांचा राजा जालंधर याने तिन्ही लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता. असे म्हणतात की यामुळे भगवान विष्णूने एक युक्ती केली आणि जालंधरचे रूप धारण केले. वृंदाने आपल्या पत्नीशी निष्ठा ठेवण्याचे व्रत मोडले गेले, परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला.
पवित्रतेचे व्रत मोडून आणि अपवित्र झाल्यानंतर, वृंदाने प्राण त्याग केला. त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शापही दिला. भगवान विष्णूच्या या रूपाला ‘शाळीग्राम’ म्हणतात. वृंदाने प्राण त्याग केलेल्या ठिकाणी तुळशीचे रोप दिसले. भगवान विष्णूंनी वरदान दिले की तुळशीचा विवाह त्यांच्या शालिग्राम रुपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील. तेव्हापासून विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीशी होतो.