---Advertisement---

चाळीसगाव घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक; ८.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

पाचोरा : चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकात भवानी ट्रेडिंगच्या बाजूला झालेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरातील शिवाजी चौक परिसरात १ फेब्रुवारी २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घरफोडीची घटना घडली. याप्रकरणी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ४१/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३०५, ३३०(१)(२), ३३१(३)(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे साजनसिंग टाक हा संशयित म्हणून निष्पन्न झाला. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक (वय-५०, रा. इनपुन पुनर्वास, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) याचा छडा लागला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमसिंगला ताब्यात घेतले.

प्रेमसिंगच्या अटकेनंतर पोलिसांनी साजनसिंग रूपसिंग टाक (वय-५०, रा. बसस्टँडमागे, चाळीसगाव, जि. जळगाव) यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ८.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, ज्यामध्ये ५,१०,००० रुपये किमतीचे ५९.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १,१५,००० रुपये किमतीचे १३७४.६५ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, राहुल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, प्रियंका कोळी, दिपक चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment