---Advertisement---

भाड्याच्या वादातून दोघा बंधूंना मारहाण, गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : शहरात गुरुनानक गणेश कॉलनीतील शिव रेसिडेन्सी अपार्टमेंट परिसरात एका चायनीज हॉटेलच्या भाड्यावरून झालेल्या वादामुळे वाघ बंधुंना मारहाण करण्यात आली आणि त्यांची रोकड व सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात ७जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश नरेंद्र वाघ (२७, रा. मोगलाई, धुळे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हर्षल गवळी याला ‘श्रीराम चायनीज’ नावाचे हॉटेल भाडेतत्त्वावर चालवायला दिले होते. मात्र, हर्षलने वेळेवर भाडे न दिल्यामुळे राकेशने हॉटेल परत घेतले. याचा राग मनात धरून हर्षल गवळी, राज गवळी, दीपक गवळी, भैय्या गवळी, सोनू गवळी, धीरज गवळी आणि राकेश शहापुरकर (सर्व रा. अमरनगर, धुळे) या सात आरोर्पीनी राकेश वाघ आणि त्याच्या भावाचा एमएच-४७ के-२४३० क्रमांकाच्या कारने पाठलाग केला.

त्यांनी राकेश आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोर्पीनी त्यांच्याकडील १६४० रुपये रोख रक्कम आणि सुमारे दीड तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. तसेच, एमएच-१८ बीएफ-४५३५ क्रमांकाच्या मोटरसायकललाही रॉडने मारून नुकसान केले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---