पारोळा : शहरातील २९ वर्षीय विवाहीतेसह अकरा वर्षीय मुलगा व सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, पारोळा पोलिसात तुषार भावसिंग महेर यांनी तक्रार दिली. ५ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान त्यांची पत्नी दिपाली तुषार महेर वय २९, चिरंजीव शिवराज तुषार महेर वय ११, कुमारी वैष्णवी तुषार महेर वय ७ हे अशोक नगर पारोळा येथील राहते घरातून घरी काही एक न सांगता निघून गेले.
याबाबत तुषार भावसिंग महेर यांनी आज बुधवारी पारोळा पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पुढील तपास हेडकोन्सटेबल योगेश जाधव हे करीत आहेत.