---Advertisement---

दोन दिवस उन्हाचा चटका बसणार; हवामान खात्याचा इशारा

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। हवामान विभागाच्या मते सोमवारी पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्री वादळ धडकणार आहे. मात्र याचा प्रभाव जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात कमी असणार आहे. यामुळे उन्हाचा तडाखा बसू शकतो असे म्हटले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार याठिकाणी मोचा चक्री वादळाचा प्रभाव कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या मते जळगाव जिल्ह्यात या दिवसात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, वादळाचा फटका जिल्ह्याला बसणार नाही.

जिल्ह्यात ९ व १० मे तापमानात वाढ होईल. वादळामुळे ढगाळ वातावरण राहील. मात्र, उकाडा कायम राहील. सध्या जून, जुलैमधील दमट वातावरण तयार झाले आहे. फार कडक ऊन पडत नाही अन्‌ पाऊसही पडत नाही. कुलर, पंख्यात बसले, तरी गरम वाट., घामाच्या धारा वाहतात, असे सध्याचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment