---Advertisement---
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात जळगावच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
अर्थात माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, नवनाथ दारकुंडे, जाकीर पठाण, फिरोज पठाण यांच्यासह अनेकांनी कमळ हाती घेतले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जी.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालय येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. अशात या प्रवेशाने जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आबा कापसे, प्रतिभा कापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, नवनाथ दारकुंडे, जाकीर पठाण, फिरोज पठाण यांच्यासह अनेकांनी कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार आहे.
भाजपला मिळणार ‘बळ’
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु झाले आहे. एकूणच काय तर भाजपाच्या लोटस अॅापरेशनला मोठे यश मिळताना दिसत असून, यामुळे जळगावातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
डॉ. महाजन आणि आमदार भोळे यांच्यातील राजकीय वादावर सोनेरी शालीचे पांघरूण!
राजकारणात ‘फार काळ कुणी कुणाचा शत्रु किंवा मित्र नसतो’ या म्हणीचा सध्या सोयीस्कर वापर होतांना सर्रासपणे दिसत आहे. राजकारणात आज वैरी असलेले उद्या मित्र आणि आज मित्र असलेले उद्याचे वैरी होतांना सर्वसामान्य जनता पाहत आली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठी राजकीय संघर्षाची परंपरा राहिली आहे. हा राजकीय संघर्ष जिल्ह्याने चांगलाच अनुभवला देखील आहे.
गेल्या दशकापासून जळगाववासियांनी आमदार सुरेश भोळे आणि डॉ. सुनील महाजन यांच्यातील कट्टर राजकीय वैराचाही असाच काहीसा अनुभव घेतला आहे. आमदार सुरेश भोळे आणि डॉ. सुनील महाजन हे समाजबांधव असले तरी त्यांच्यातील राजकीय स्पर्धा आणि टोकाचे विरोध हे नेहमीच चर्चेत राहिले.
आ. भोळे आणि डॉ. महाजन यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. नुकतेच महापालिकेच्या जुन्या भंगार पाईप चोरी प्रकरणातही माजी महापौरांचे पती असलेले डॉ. सुनील महाजन यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या चौकशीसाठी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी थेट विधानसभेत आवाज उठविला होता. राजकारणातून एकमेकांना उठविण्यासाठी जेजे शक्य होईल तेते सर्व प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केल्याचे जळगावकरांनी पाहिले आहे. आता डॉ. सुनील महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांच्यातील राजकीय वादावर सोनेरी शालीचे पांघरूण पडले आहे.









