वृद्धाला बोलण्यात गुंतवून लंपास केले दोन ग्रॅम सोने, भुसावळतील घटना 

भुसावळ : शहरातील ६० वर्षीय वृद्धाला भामट्यांनी ‘एक शेठ पैसे वाटप करीत आहे, तुमच्या अंगावरचे सोने पाहून तो तुम्हाला पैसे देणार नाही, त्यामुळे अंगावरील सोन काढून ठेवा’ असे सांगत महिलेस बोलण्यात गुंतवून तिचे दोन ग्रॅम सोने व एक हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारीच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गवळी वाड्यातील रहिवासी सुगरा बी.गवळी या मार्केटमध्ये दुपारी चारच्या सुमारास जात असताना दोन युवकांनी येत गुरुनानक परीधान या दुकानाजवळ एक शेठ पैसे वाटप करीत आहेत, तुमच्या अंगावर असलेले सोने पाहून ते तुम्हाला पैसे देणार नाही, यामुळे तुमच्या अंगावरचे सोने तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगून त्यांनी दोन ग्रॅम सोन्याचे मनी पिशवीत ठेवण्यास सांगितले व वृद्धेस बोलण्यात गुंतवीत सोन्याचे मनी ठेवलेले पिशवी व एक हजारांची रोकड गायब केली.

याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजद्वारा चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास हवालदार अन्वर दिलावर शेख करीत आहेत.