---Advertisement---
---Advertisement---
धुळे : क्षुल्लक कारणावरून जुने धुळे सुभाष नगर येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई दीपक तुपे (१७, रा. १४, सुभाष नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ जुलै रोजी गुरुदत्त मेडिकलसमोरून दुचाकीवरून जात असताना, “माझ्याकडे का बघतोस” या कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यात त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आणि दुखापत झाली. ही फिर्याद २३ जुलै रोजी मध्यरात्री दाखल झाली. याप्रकरणी तुषार जगदीश काळे, जगदीश दिगंबर काळे, विकास दिगंबर काळे, आतिष जगदीश काळे, आणि कपिल हिरालाल काळे (सर्व रा. सुभाष नगर,) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
दुसऱ्या गटाकडून तक्रार….
दुसऱ्या गटाकडून तुषार जगदीश काळे (१९, रा. सुभाष नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ जुलै रोजी बर्फ कारखान्याजवळ बांबू
गोडाऊनजवळ उभे असताना, साई दीपक तुपे आणि त्यांच्या साथीदारांनी माझ्याकडे का बघतोस” असे म्हणत त्यांना मारहाण केली. ही फिर्याद २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता दाखल झाली.
या प्रकरणी साई दीपक तुपे, विवेक दीपक तुपे, चेतन तुपे, वेदांत बाविस्कर, प्रतिक भटू काळे, आणि दुर्गेश सुनील पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.