तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। केंटुकी भागातील बुधवारी रात्री सरावा दरम्यान हवेतच दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिय अधिकारी आणि बचावपथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केंटुकी भागातील बुधवारी रात्री सरावा दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात नऊ जणांचा मृत्यूची माहिती समोर आली आहे. स्थानिय अधिकारी आणि बचावपथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे’
अमेरिकेच्या हवाई दलामध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आपल्या क्षमतेमुळे ओळखले जाते. व्हिएतनामा युद्धानंतर या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती. जगभरात अमेरिकेचे मित्र राष्ट्र स्पेशल फोर्समध्ये ब्लॅक हॉकचा वापर करतात. विशेष ऑपरेशनसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. या हेलिकॉप्टरचा वेग हा इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत सर्वाधिक आहे.