Taloda : तळोदा तालुक्यातील तुळाजा येथे आग लागून दोन घरे जळून खाक झाले आहेत.
सकाळी देवाला दिवा लावून सुमारे 11 वाजेच्या सुमारास घर मालक रेशनधान्य घेण्यासाठी घराच्या बाहेर गेले असतांना झोपडीला अचानक आग लागून साहित्य जळून खाक झाले. आग इतकी प्रचंड होती की, काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले व घरातील संसारोपयोगी सर्व समान जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी सरपंच मीराबाई राहसे, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे, उपसरपंच संदिप खर्डे, विक्रमसिंग डूमकुळ, सचिन राहसे, तंटामुक्त अध्यक्ष तेजाब ठाकरे व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आगीचे स्वरूप इतके प्रचंड होते की होत्याचे नव्हते झाले. या आगीत खुशाल तानाजी नरवत व आण्णा तानाजी नरवत ह्या दोघा भावंडांचे घर जळून खाक होऊन संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामा करुन शासकीय मदतीची अपेक्षा आहे.