वाहनाच्या धडकेत दोघे जखमी, गुन्हा दाखल

---Advertisement---

 

जळगाव : भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे प्रमोद पद्माकर पाटील व कृष्णा राजेंद्र पाटील हे जखमी झाले. हा अपघात १७ ऑक्टोबर रोजी पातोंडा, ता. अमळनेरनजीक झाला.

या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बेपत्ता इसमाचा तलावात आढळला मृतदेह

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले संतोष वामन नेरपगार (वय ५९, रा. शिरसोली रोड) यांचा मृतदेह १९ ऑक्टोबरला मेहरूण तलावात पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत पोलिसात नोंद झाली आहे. मयताच्या खिशात असलेल्या एका क्यूआर कोडवरून त्यांची ओळख पटली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---