---Advertisement---

इसिसच्या दोन दहशतवाद्यांना मुंबईत अटक, पुण्यात होते कार्यरत

---Advertisement---

इराक आणि सिरियासह देशभरात धुमाकूळ घालत हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोन सदस्यांना मुंबई विमानतळावरून राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान, अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. २०२३ मध्ये पुणे येथे आयईडी स्फोटकाची चाचणी करण्यात आली होती. याप्रकरणातील अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान हे फरार होते. एनआय त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथे लपले होते.

दोघे भारतात परत येत असल्याचा सुगावा तपास अधिकाऱ्यांना लागला होता. मुंबई विमानतळावर येताच टर्मिनल-२ मध्ये त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दोघांना अटक करून त्यांना कोठडीत ठेवल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. दोघांविरोधात मुंबई एनआयए विशेष न्यायालयाने गैरजमानती वारंट बजावले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या शिरावर तीन लाखांचे बक्षिसही ठेवले होते. इसिसच्या स्लीपर सेलचे एकूण दहा दहशतवादी पुण्याच्या कोंढवा भागात काम करीत होते. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरूद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदेवाला, शमील नाचन, अकीफ नाचन आणि शहानवाज आलम या आठ दहशतवाद्यांना यापूर्वीच अटक केली असून सर्वजण तुरूंगात आहेत.

पुण्यात सुरू होती बॉम्ब तयार करण्याची कार्यशाळा

पुण्यातील कोंढवा भागात अब्दुल्ला फैय्याज शेख याने भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी स्फोटके आणि बॉम्ब तयार करण्याची, चाचणीची कार्यशाळा घेतली होती. तसेच चाचणीसाठी नियंत्रित आणि कमी क्षमतेचे स्फोटही घडविण्यात आले होते. काल अटक करण्यात आलेल्या दोघांसह एकूण आरोपींची संख्या दहा झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment