---Advertisement---

संतापजनक! जळगावात ३५ वर्षीय तरुणाचे दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे

---Advertisement---

Jalgaon Crime News : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. नुकताच धरणगाव तालुक्यात टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ताजी असताना असाच काहीसा प्रकार जळगाव शहरात समोर आलाय.

जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका ३५ वर्षीय तरुणाने अश्लिल चाळे करत विनयभंग केला. ही धक्कादायक घटना रविवार, २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली. या प्रकरणी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात ६ वर्षीय आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित मनोज भीमराव धनगर (वय २५ रा. जळगाव) याने रविवार, २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित मनोज भीमराव धनगर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment