नंदुरबारमध्ये रेल्वेमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला, तणावाचे वातावरण!

नंदुरबार : चेन्नईहून जोधपुरकडे जात असलेल्या एका एक्स्प्रेस ट्रेनमधील दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

सुरुवातीला भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाची दोन राजस्थानी प्रवाशांबरोबर बसण्याच्या जागेवर वाद झाला. हा वाद नंतर इतका चिघळला की नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या त्या प्रवाशाने आपल्या काही सहकाऱ्यांना बोलावून चाकूने हल्ला केला.

हेही वाचा : बायकोने नवऱ्याला लावला चुना; किडनी विकायला लावली अन्… वाचाल तर थक्क व्हाल

प्राथमिक माहिती नुसार, हल्ल्यामुळे दोन्ही जखमी प्रवाशांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अवश्यक उपचार करण्यात आले. दरम्यान, ही ट्रेन मार्गस्थ झाली.

हेही वाचा : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून घटनेनंतर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

सुरक्षेच्या दृष्टीने, रेल्वे प्रशासनाने योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले आहे.