---Advertisement---
जळगाव : मुलीस भेटण्यासाठी आलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फसाना सिकंदर तडवी (वय ६५) व लहान बहीण हसीना बाबू तडवी (वय ५१) असे दोघींचे नाव आहे.
रावेर सीमेलगतच्या पातोंडा, ता. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे सासरी असलेल्या मुलीस अडावद (ता. चोपडा) येथून भेटायला आलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणी बुधवारी पहाटे पातोंड येथे रेल्वे अपघातात ठार झाल्या.
चोपडा येथील अफसाना सिकंदर तडवी (वय ६५) व तिची लहान बहीण हसीना बाबू तडवी (वय ५१) या मुलगी अलिशान तडवी हिला भेटण्यासाठी मंगळवारी पातोंडा येथे आल्या होत्या.
दरम्यान, बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गावालगत प्रातर्विधी आटोपून या दोन्ही बहिणी रेल्वे मार्ग ओलांडून येत असताना, अप व डाऊन मार्गावरून मुंबई तथा दिल्लीकडे धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या एकाच वेळी दोन्ही दिशांनी येऊन धडकल्याने गोंधळून गेलेल्या त्या दोन्ही बहिणींचा धावत्या रेल्वे गाडीखाली चेंगरून अकस्मात घटना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली. याप्रकरणी लालबाग (बऱ्हाणपूर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.