Murder News : व्याजाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रूप नारायण सोनी (वय ६५ ) असे हत्या झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लखनऊच्या दुबग्गा भागात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूप नारायण सोनी (वय 65) यांचे दुबग्गा परिसरात पवन ज्वेलर्स नावाचे दुकान असून, त्यांच्याकडे २४ डिसेंबर रोजी एका महिलेने दागिने गहाण ठेवले होते. त्या बदल्यात महिलेला १२ टक्के व्याजाने ६५ हजार रुपये रोख मिळाले होते. या महिलेने एक महिन्याचे व्याज दिले, मात्र नंतर पैशांअभावी ती व्याज देऊ शकली नाही.
हेही वाचा : दोघांत तिसरा, संतापलेल्या नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं
दरम्यान, दोन महिने उलटल्यानंतर रूप नारायण हा महिलेसोबत गैरवर्तन व तिच्या अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरत असे. तसेच त्याने या अल्पवयीन मुलींचे नंबर घेऊन, व्याजाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करत त्यांना दबाव टाकत असे. याला कंटाळून दोन्ही बहिणींनी चुलत भावांना हा प्रकार सांगितला.
शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली अन् घरी बोलावले
त्यानंतर दोन्ही बहीण आणि खाजगी रुग्णालयात काम करणारे तीन चुलत भाऊ, असे या पाचही जणांनी रूप नारायणच्या हत्येची योजना आखली. योजनेनुसार दोन्ही बहिणींनी रूप नारायणसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली. त्याला फोन करून ‘घरी ये, कोणी नाहीय…’, असे सांगून बोलावले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रूप नारायण घरी पोहोचले असता त्यांची विटेने मारहाण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह आयआयएम रोड घैला पुलाखाली फेकून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे, या अल्पवयीन मुलींनी त्यांच्या आईलाही हा प्रकार कळू दिला नाही. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
असा झाला घटनेचा उलगडा
घटनेचा उलगडा करण्यासाठी सीसीटीव्ही आणि टेहळणीची मदत घेण्यात आली, त्यानंतर आरोपी गोलू (२० ), विनय कुमार उर्फ छोटू (१९ , रा. अत्रौली, हरदोई आणि हंसराज (२० , रा. मशीदा माल) यांना अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपी पश्चिम विश्वजित श्रीवास्तव यांनी दिली.