---Advertisement---
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेतर्फे नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्या २३ व २४ जुलै रोजी धावणार असून, त्या-त्या भागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार आहे.
गाडी क्र. ०१२०६ ही एकेरी विशेष अनारक्षित गाडी २३ व २४ जुलैला नागपूरहून सायंकाळी ७:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता नाशिक रोड स्थानकात पोहोचेल.
या गाडीला नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड येथे थांबे असतील. या विशेष गाडीमध्ये एकूण १८ अनारक्षित डबे असतील. त्यात १६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ एसएलआरडी कोच असेल.
पाळधी रेल्वे गेटजवळील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी
धरणगाव : पाळधी रेल्वे गेटजवळील रस्त्याची दुरुस्ती करून या रस्त्याच्या हद्दीचा वाद सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्हि. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. पाळधी येथील रेल्वे गेटजवळील खराब झालेला रस्ता नेमका कोणाच्या ताब्यात आहे, असा प्रश्न केला. त्यानंतर हा रस्ता रेल्वेच्या हद्दीत आहे; परंतु हा रस्ता २५- ३० गावांची लोक वापरतात; त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच खासदार स्मिता वाघ व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष देऊन दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. धरणगाव तालुक्यात लम्पी आजाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पशु विभागानेही धरणगाव तालुक्यात त्वरित लसीकरण सुरू करावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.