दुर्दैवी! दुचाकीवरून निघाले अन् काळाने केला घात, संपूर्ण कुटुंब उध्वस्त

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाला आहे.

ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ आज शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, डंपर चालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ आज शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून निघालेलं एक संस्थानिक कुटुंब भरधाव डंपरच्या धडकेत उध्वस्त झालं. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, BNA Infrastructure कंपनीच्या डंपरने ही धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनुसार, अपघात इतका भीषण होता की, तिघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिकांनी तातडीने मदत केली, मात्र तिघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, अतिवेग आणि बेफिकीर वाहन चालन हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, डंपरचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---