---Advertisement---

दुर्दैवी! अंदाज चुकला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

---Advertisement---

नवापूर : तालुक्यातील गताडी येथे विहिरीच्या खोदकामावेळी अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, विश्वास जोगु गावीत (२३) व कृष्णा काशीराम गावीत (वय ३३) असे मृतांचे नाव आहे.

नवापूर तालुक्यातील गताडी येथे रोजण्या गावीत यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचं काम सुरू असून, या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते. सोमवारी, २४ मार्च रोजी रात्री विश्वास जोगु गावीत (२३) रा. वागदी, ता. नवापूर हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने (क्र. एम. एच .18 झेड 7160) काम करत होता. या वेळी त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावीत (वय ३३) रा. हळदाणी ता. नवापुर हा देखील सोबत होता.

दरम्यान, रात्रीच्या वेळी विहीरी जवळून ट्रॅक्टर घेऊन जात असताना अंदाज चुकल्याने दोघांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रात्रीच्या अंधारात मोठ्या जेसीबीच्या साहाय्याने विहीरीत पडलेला ट्रॅक्टर बाजूला करुन दोन्ही मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह विसरवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची माहिती मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी एकच टाहो फोडला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment