जळगाव । दुर्गा उत्सव मंडळात आरास तयार करताना विजेचा धक्का लागून दोन घटनांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिली घटना गरताड (ता. चोपडा) येथे तर दुसरी घटना भुसावळ येथे घडली. केतन समाधान पाटील (१९, रा.गरताड, ता. चोपडा) आणि प्रतीक अनिल मिसाळ (२३, रा. रेल्वे नॉर्थ कॉलनी, भुसावळ) अशी या मृत तरुणांची नावे आहेत.
चोपडा फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला गरताड येथील केतन पाटील हा बधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गल्लीतील मंडळात घटस्थापनेसाठी आरास तयार करीत होता. त्याचवेळी त्याला विजेचा जबर धक्का लागला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केतन हा समाधान मधकर पाटील यांना एकुलता मुलगा होता.
दुसरी घटना भुसावळ येथे मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. रेल्वे नॉर्थ कॉलनी भागात संघर्ष दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते आरास करत होते. त्यावेळी प्रतीक मिसाळ याला शॉक लागला.
त्याला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ट्रामा केअर सेंटर येथे विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी प्रतीकचे मामा रत्नाकर गोविंद तायडे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसात अकस्मात
मत्यची नोंद करण्यात आली.