---Advertisement---
जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेले असताना गिरणा नदीत बुडालेल्या गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) व राहुल रतीलाल सोनार (३४, रा. वाघ नगर) या तरुणांचा तीन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. या संदर्भात आता धुळे व नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासही शोध घेण्याविषयी कळविण्यात आले आहे.
ममुराबाद येथील गणेश कोळी हा तरुण भोकणी शिवारात तर राहुल सोनार हा गिरणा पंपिंग परिसरात गणेश विसर्जनासाठी गेले असताना गिरणा नदीपात्रामध्ये बुडाले होते.
तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र अजूनही हाती लागलेले नाही. या संदर्भात आता धुळे व नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासही शोध घेण्याविषयी कळविण्यात आले आहे.
तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : घर घेण्याकरीता माहेरुन तीन लाख रुपये आणावे यासाठी भाग्यश्री दिलीप परदेशी (३०) या विवाहितेचा पतीने छळ केला. हा प्रकार सन २०१५पासून सुरू होता.
या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस फिर्याद दिली. त्यावरून पती दिलीप भगीरथ परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शामकुमार मोरे करीत आहेत.