PSL 2025 : भारत-पाकिस्तान तणावामुळे पीएसएल २०२५ मध्येच स्थगित करावी लागली. यानंतर, पीसीबीने स्पर्धेतील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, यूएईने PSL च्या सामन्यांना स्पष्ट नकार देत, परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता PSL चे उर्वरित सामने कुठे खेळवले जातात हे पाहावं लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या T20 स्पर्धेचा चालू हंगाम पीएएसएल मध्येच थांबवावा लागला. यानंतर, पाकिस्तानी बोर्डाने उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. पण आता हा प्रयत्नही अपयशी ठरताना दिसत आहे. कारण यूएईने PSL च्या सामन्यांना स्पष्ट नकार देत, परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता PSL चे उर्वरित सामने कुठे खेळवले जातात हे पाहावं लागणार आहे.
दुसरीकडे, भारतातही बीसीसीआयकडून आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणस्तव हा निर्णय घेत असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता विदेशी खेळाडूंना परत पाठवले जाणार आहे. मात्र उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळवले जातील याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
बीसीसीआय आता शक्य तितक्या लवकर परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. परदेशी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबदेखील सध्या भारतात आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. लीग स्थगित केल्याची पुष्टी करताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू राहिले तर ते चांगले दिसत नाही.”