---Advertisement---
जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शनिवारी (१२ जुलै) रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उबाठा गटातील जवळपास 100-125 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
---Advertisement---
जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात भाजपाचे खासदार निवडून येत आहे. जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातही भाजपाची ताकद अधिक आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी दिल्या.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपा कार्यालयात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा(उबाठा),चमगाव,सोनवद,बाभुळगाव (शरद पवार गट)या गावातील 100 ते 125 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी आ. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बावीस्कर, दिपक सूर्यवंशी, पी. सी. पाटील, संजय गरुड, दिनेश पाटील, जिजाबराव पाटील, कन्हैय्या रायपूरकर, निर्दोष पवार, चंदन पाटील आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते
छत्रपती शिवरायांना वंदन
युनेस्कोने राज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून शिवरायांचा जयजयकार केला
धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील वैद्यकिय आघाडी सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील, भोदचे मा. सरपंच संभाजीराव भालेराव पाटील, चमगांव वि. का. सो.चे माजी चेअरमन भगवान दलपत पाटील, चमगावचे माजी उपसरपंच वसंतराव गैंधल पाटील, प्रविण मांगो पाटील, भगवान वामन पाटील, युवा कार्यकर्ता ललित प्रकाश पाटील, चमगाव माजी ग्रा.पं. सदस्य विठ्ठल काशिनाथ कोळी, संजय मंगा शिरसाठ,- युवा कार्यकर्ता जयस्तु रविंद्र पाटील, गोकुळ मांगो पाटील, हिलाल साहेबराव पाटील, मिलन दत्तू सावंत, बाभूळगावचे माजी ग्रा.पं. सदस्य जगदिश गोपिचंद पाटील यांचा समावेश होता.
बिलखेडा येथील शिवसेना उबाठा गटाचे चंद्रकांत शांताराम काटे, चंद्रकांत सुभाष पाटील, दिलीप शांताराम पाटील, योगेश दिनकर पाटील, भाऊसाहेब पुडलिंक पाटील, भगवान पंडित पाटील, भारत हिरालाल पाटील, संतोष पाटील, सागर ईश्वर पाटील, संदिप वसंत पाटील, निलेश सुभाष पाटील, ) अमोल राजेन्द्र साळूखे, धिरज अशोक भदाणे, शरद उत्तम शिंदे, बापू एकनाथ पाटील, कैलाश मधुकर भदाणे, विजय दगडू भदाणे, सागर साहेबराव पाटील, किशोर युवराज पाटील, पिटू युवराज पाटील, दगडू भिमराव पाटील, गणेश नवल पाटील, विजय धुडकू भामरे, योगश भगवान काटे, दिनेश सुभाष पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.