बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. युको बँकेत शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू आहे. या भरतीद्वारे एकूण 544 जागा भरल्या जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2024 आहे, इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावेत.
रिक्त पदाचे नाव : शिकाऊ (Apprentice)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
तुम्हाला किती स्टायपेंड मिळेल?
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थीच्या कालावधीत दरमहा रुपये 15000 (भारत सरकारने दिलेल्या अनुदानाच्या रकमेसह) दिले जातील.
निवड कशी होईल?
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची निवड बँकेच्या विवेकबुद्धीनुसार स्क्रीनिंग आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेचा समावेश असल्यास, त्याची माहिती बँकेच्या वेबसाइटवर दिली जाईल. उमेदवारांनी मुलाखती/ लेखी परीक्षेत किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे (SC/ST/OBC/PWBD उमेदवारांसाठी, 5% सूट उपलब्ध आहे). मुलाखत / लेखी परीक्षेतील किमान पात्रता बँक ठरवेल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा