Maharashtra Politics : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळ चांगलंचं तापलं आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्याेगमंत्री उदय सामंत यांची एकमेकांवर शाब्दिक टाेलेबाजी सुरु आहे. खासदार राऊतांनी उद्याेगमंत्री सामंत यांची अक्कल काढल्याने सामंतांनी आज तीव्र शब्दांत राऊतांना फटकारलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
बारसू प्रकल्पावरुन खासदार संजय राऊत यांनी उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना सामंत यांनी काेणताही सरकारी कागद नाचवून शहाणपणा शिकवू नये असे म्हटलं.
उदय सामंत काय म्हणाले?
त्यावर आज (गुरुवार) माध्यमांनी उदय सामंत यांना याविषयी छेडलं असता सामंत यांनी राऊत हे जगातले सगळ्यात माेठे विद्वान असल्याची बाेचरी टीका केली. उदय सामंत म्हणाले, देशातल्या विद्वानांचे संजय राऊत महामेरू आहेत म्हणून ते प्रत्येकाची अक्कल काढतात. जगाच्या पाठीवर आता एकही विद्वान शिल्लक राहिलेला नाही जो या खासदार महोदयांच्या स्पर्धेत असेल.
विरोधीपक्ष सूद्धा सुट्टीवर जात नाही तिथे आपले मुख्यमंत्री सुट्टीवर जातात या संजय राऊत यांच्या टीकेवर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिल आहे. सकाळची साडेनऊची पत्रकार परिषद कोणालाही नवीन नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले ज्यांनी बारसूत रिफायनरीसाठी पत्र दिल ते कशासाठी दिल याचं शहाणपण त्यांना पहीलं विचारून घ्यावं असा टोला यावेळी उदय सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.