Uddhav Thackeray : मुंबईत मोठा धक्का; १७ नगरसेवक शिंदे गटात…

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये उद्धव ठाकरेंची देखील चिंता वाढत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाटोपाठ तब्बल ठाकरे गटाच्या आजी-माजी 17 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः उद्धव ठाकरे पक्षाचा विस्तार वढवण्यासाठी राज्यात दौरे करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत त्यांना धक्के बसत आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक 79 चे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदानंद वामन परब यांच्यासह ठाकरे गटातून 17 आजी-माजी नगरसेवक आज शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे.